Sandeep Naik Join Sharad Pawar : उद्या नवी मुंबईत संदीप नाईकांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Continues below advertisement

Sandeep Naik Join Sharad Pawar : उद्या नवी मुंबईत संदीप नाईकांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
उद्या संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित  नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संदीप नाईक यांचा प्रवेश पार पडणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती  संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं तिकीट  संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक महायुतीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार तर संदीप नाईक बेलापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार

हे ही वाचा....

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत (Mahayuti) भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी (NCP Ajit Pawar Group Candidate List) आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  पहिल्या यादीत 32 ते 35 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत 17 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. 

राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजित पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप केले जात असून भरत गावित आणि हिरामण खोसकर यांच्यासह 15 जणांना अर्ज मिळाले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram