Morning Prime Time : सनातन धर्मामुळे भारताचं वाटोळं झालं, जितेंद्र आव्हाडांची टीका
अकोल्यातील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी वस्तीगृहासाठी निधी मंजूर करण्याबाबत वक्तव्य केले. "सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जातंय" असे शिरसाट म्हणाले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सनातनी दहशतवाद' असे वक्तव्य केल्याने वाद सुरू झाला. जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबाबत आणखी एक वक्तव्य केले. "सनातन धर्माचं भारतानं वाटोळं केलं" असे आव्हाड म्हणाले. सनातन धर्माने शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, छत्रपती संभाजीराजेंना बदनाम केले, महात्मा फुलेंना मारण्याचा प्रयत्न केला असे दाखले आव्हाड यांनी दिले. मालेगाव बॉम्बस्फोटातील खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी धक्कादायक दावा केला. "मोदींचं नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं धक्कादायक वक्तव्य" साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले. मोहन भागवत आणि आदित्य नाथांचे नाव घेण्यासाठीही तपास यंत्रणांनी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तिणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात आत्मक्लेश पदयात्रा सुरू झाली आहे. दौंड येथील सभेत एका तरुणाने अजित पवारांकडे महादेवी हत्तिणीला परत आणण्याची मागणी केली. पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी जातिवाचक शब्द वापरुन मारहाण केल्याचा आरोप तीन मुलींनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाईची मागणी केली आहे. भंडाऱ्याच्या साकोलीतील मालगुजारी तलाव फुटल्याने शेकडो हेक्टरमधील शेती पाण्याखाली गेली. यवतमध्ये धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट शेअर केल्याने तणाव निर्माण झाला.