Meghana Bordikar Explanation : ग्रामसेवक छळ करतो, म्हणून खडसावलं, मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी गावात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला धमकावल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत, घरकुलाच्या लाभार्थ्यांना न आणल्याने बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. या आरोपांवर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विधवा आणि मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिला लाभार्थ्यांचा ग्रामसेवक छळ करत होता. तो पैशांची मागणी करत होता. या महिला माझ्याकडे येऊन रडत होत्या. त्यामुळे, "ज्या भाषेत कळेल त्याच भाषेत समज दिली," असे बोर्डीकर यांनी सांगितले. मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, अतिरिक्त सीईओ आणि बीडीओ उपस्थित होते. ग्रामसेवक गोरगरिबांना त्रास देत असल्याची माहिती त्यांना वारंवार दिली होती. रोहित पवार आणि स्थानिक विरोधक अर्धवट व्हिडिओ दाखवून जनतेची दिशाभूल करत असल्याचे बोर्डीकर यांनी म्हटले आहे.