Samruddhi Mahamarg Special Report : 'समृद्धी'ला तडे,मृत्यूचे सापळे
Samruddhi Mahamarg Special Report : 'समृद्धी'ला तडे,मृत्यूचे सापळे राज्याच्या विकासाच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बांधला खरा... मात्र या समृद्धीवर आता मृत्यूचे सापळे तयार झालेत. अत्यंत धक्कादायक असा प्रकार एबीपी माझाने आज जगासमोर आणला, त्याची गंभीर दखलही तातडीने यंत्रणांना घ्यावी लागली... काय घडलाय नेमका प्रकार पाहूया हे मोठमोठे तडे, या मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत महामार्गाला हा महामार्गही साधासुधा नाही... जिथे गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात असा समृद्धी महामार्ग...५५ हजार कोटी रूपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधलाय.. महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघं एक वर्ष झालं, तोच या महामार्गाला मोठमोठाले तडे, भेगा पडल्याचं दिसतंय. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ ३ सेमी रुंद आणि ५० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता, तो फोल ठरला. माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर असा खड्डा पडला असून कधीही अपघात होईल अशी शक्यता आहे. समृद्धी महामार्गावरची ही भयानक अवस्था... पुलावरील रस्त्याची अवस्थाही वेगळी नाही. पुलावर खड्डे पडलेत. एखादं मोठं वाहन तिथून गेलं, तर संपूर्ण रस्ता हलतो... पुलावरील या खड्ड्यामुळे भरधाव वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी समृद्धी भ्रष्टाचाराविषयी मी बोललो होतो समृद्धी महामार्ग प्रकल्पला टेंडर प्रक्रियेत 23 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. भ्रष्टाचार किंवा अतिरिक्त पैसा सरकारचा गेला. या प्रकल्पातून काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाभ मिळाला असावा. गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्यात भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गाच्या खर्चातून झाला.