Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर प्रशासनानं आखून दिलेल्या नियमाचं सर्रास उल्लंघन : ABP Majha
समृद्धी महामार्गावर प्रशासनानं आखून दिलेल्या नियमाचं सर्रास उल्लंघन करत असल्याचं समोर आलंय. समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबण्यास मानाई आहे.. मात्र मेहरकरजवळ पेट्रोल पंपाजवळ असलेल्या अनाधिकृत टपऱ्यांवर ही वाहनं येऊन थांबतात..या वाहनांमुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय. त्यामुळे आज सकाळपासून समृद्धी महामार्गावर अशा अनेक वाहनांच्या रांगा मेहकरजवळ लागल्याचं दिसून आलं.. मात्र या सगळ्या प्रकारावर MSRDC किंवा वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीयेत.