Samruddhi Highway Accident : 'समृद्धी'वरील 'त्या' अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर, RTOच्या अडचणी वाढणार?
abp majha web team
Updated at:
16 Oct 2023 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) काल रात्री झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. नाशिकहून बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांच्या ग्रुपवर काळानं घाला घातला. समृद्धी' महामार्गावर काल अपघात झालेल्या ट्रकला आरटीओने (RTO) थांबवला असतानाचा व्हिडीओ समोर आलाय. याच ट्रकला धडकून ट्रॅव्हल्समधील 12 जणांचा मृत्यू झालाय. हायवेवर गाडी थांबवणाऱ्या दोन अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असं या निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचं नाव असून दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत.