Samruddhi Expressway : समृध्दी महामार्गावर जितका प्रवास तितकाच टोल, जाणून घ्या कशी असेल सुविधा?
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या डिसेंबर महिन्यांपूर्वी हा महामार्ग पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती मिळाली असून हा महामार्ग म्हणजे स्वप्नवत असणार आहे. या महामार्गावर फक्त चारचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेश असणार असून समृद्धी महामार्गावर मुंबई ते नागपूर पर्यंत कुठेही टोल बूथ नसणार आहे. फक्त ज्याठिकाणी तुम्ही समृद्धी महामार्गावरील प्रवास संपविणार आहे त्या एक्झिट पॉइंटलाच तुम्ही केलेल्या प्रवासाच्या अंतरा इतका टोल तुम्हाला भरावा लागणार आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा कशी काम करणार आहे.