
Samruddhi Expressway Potholes : समृद्धी महामार्गावर खड्डे, 'ABP माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
Continues below advertisement
Samruddhi Expressway Potholes : समृद्धी महामार्गावर खड्डे, 'ABP माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरून व 55 हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम सात महिने झाले आहेत. पण पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गावर कुठे खड्डे पडत आहे तर कुठे पुलाना भेगा पडत आहेत आणि त्यामुळे या महामार्गाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. समृद्धी महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहने अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पाहुयात एबीपी माझा चां स्पेशल रिपोर्ट. समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई असा 701 किलोमीटरचा असलेला स्वप्नवत वाटणारा हा महामार्ग जवळपास 55 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करून बांधण्यात आलेला आहे गेल्या 11 डिसेंबर रोजी मोठ्या थाटात या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजे नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या महामार्गाला सातच महिने झाले मात्र महामार्गावर आता पॅकेज 6 आणि 7 वर पूलांवर भेगा पडण्याचं आणि खड्ड्यांचं ग्रहण सुरू झालेल आहे . पॅकेज 6 हे apko कन्स्ट्रक्शन कंपनीने तर पॅकेज 7 हे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने याठिकाणी काम केलेलं आहे. समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक अनेक पूलांवर खड्डे पडले आहेत तर काही पुलांवर भेगा सुद्धा पडल्या आहेत त्यामुळे या महामार्गाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.
Continues below advertisement