Sanjay Raut Full PC : एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम कुठे असतात? गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम कुठे असतात? गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा 

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी  (Baba Siddique Shot Dead) यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली आहे.  गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, असे त्यांनी म्हटले आहे. 

संजय राऊत म्हणाले की, दिवसा जनतेसमोर रक्तपात, हिंसाचार, दहशत, खंडणीसत्र सुरू आहे. अशा वेळेला राज्याच्या गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? तुरुंगात मारामाऱ्या सुरू आहेत, दंगली सुरू आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी आणि निष्क्रिय हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. आता गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवाने आली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram