Sameer Wankhede : समीर वानखेडे यांचं निलंबन होणार? प्रक्रिया काय सांगते? ABP Majha
Continues below advertisement
IRS अधिकारी समीर वानखेडे यांची CBI ने आज तब्बल पाच तास चौकशी केलीय. त्यासाठी खास दिल्लीहून सीबीआयचं पथक आलं आलंय. सकाळी तीन तास आणि एका ब्रेकनंतर दुपारी दोन तास अशी एकूण पाच तास समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर वानखेडे यांचं निलंबन होऊ शकतं, असं म्हटलं जातंय. प्रोटोकॉल प्रोसेसनुसार त्यांचं निलंबन होऊ शकतं. दरम्यान, वानखेडे यांची मालमत्ता, त्यांच्या परदेशी वाऱ्या, महागड्या गाड्या सोबतच आर्यन खान प्रकरणात ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप आणि शाहरूख खानकडे २५ कोटी रुपये मागितल्याचा आरोपांप्रकरणी वानखेडे यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्याचवेळी आर्यनची अटक झाली त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज करप्ट होणं आणि त्यासाठी सीसीटीव्हीच्या वायरी उंदरानं कुरतडल्याचं दिलेलं कारण याबाबत CBI ला संशय येतोय.
Continues below advertisement