#Maratha मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांची भेट घेतोय : संभाजीराजे छत्रपती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 May 2021 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आज (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं शरद पवारांना सांगितल्याचं संभाजीराजे भेटीनंतर म्हणाले. तसंच उद्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करुन संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार अशी माहितीही संभाजीराजे यांनी दिली.