Maratha Reservation : मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरु करणार: संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.