
Pimpari Hawkers Women Beating : एसएसएफच्या महिला रक्षकांकडून भाजी विक्रेती महिलेला मारहाण
Pimpari Hawkers Women Beating : एसएसएफच्या महिला रक्षकांकडून भाजी विक्रेती महिलेला मारहाण रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा भाजीचा गाडा जप्त करण्याची कारवाई करत असताना झालेल्या वादातून महिला सुरक्षा रक्षक संबधित महिलेला मारहाण करत असल्याचं व्हिडीओ मध्ये दिसत आहे. महिला सुरक्षा रक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेचा हात पिरगाळत, पाठीत ठोसे मारत ह्या भाजी विक्रेत्या महिलेला जमिनीवर ढकलून देत मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय.
ा संपूर्ण प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप बघायला मिळतोय ,पिंपरी महापालिकेचे हॉकरस धोरण अद्यापही कार्यरत होत नसल्याने अनेक पथारी धारक रस्त्याच्या कडेला भाजी आणि इतर वस्तू विकतात , त्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने असे अतिक्रिम काढण्यासाठी महापालिकेनं एक पथक नेमल आहे. ज्या मध्ये MSF जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांना मार्फत अतिक्रमण कारवाई केली जाते. मात्र अशी कारवाई करत असताना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारहाण करता येत नाही तरी देखील अशा प्रकारची मारहाण केल्या गेल्याने आता महापालिका प्रशासन काय कारवाई करत याकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे.