Sambhaji Bhide Sangli : 'निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान' वादग्रस्त वक्तव्यामुळे संभाजी भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सांगलीत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन मारेकरी पण हिंदू ना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे, तो म्हणजे निर्लज्ज पणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात राहण्याचा बेशरमपणाचा हा देश आहे. लाज वाटत नाही. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे असे संभाजी भिडे म्हणालेत.