Jalna : समर्थ रामदास स्वामींचे देव श्रीराम मंदिरात पुन्हा विराजमान, 2 महिन्यांनी चोरीचा छडा

 जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरात पु्न्हा एकदा समर्थ रामदास स्वामींचे देव विराजमान झालेत... समर्थांच्या राम मूर्तीची वाजतगाजत पुनर्स्थापना करण्यात आली यावेळी  रामनामाचा जयघोष करण्यात आला..  काल पोलिसांनी मूर्ती मंदिर विश्वस्त आणि ग्रामस्थांकडे सुपू्र्द केल्यानंतर मोठ्या जल्लोषात समर्थांच्या देवांची मिरवणूक काढण्यात  आली होती.. ऑगस्ट महिन्यात समर्थ रामदास स्वामींच्या, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या.. तब्बल दोन महिन्यांच्या तपासानंतर या मूर्ती चोरीचा छडा लावण्यात यश आलं. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola