ABP News

Salman Khan : एक दिवस तुझंही भांडं फुटणार... Ex-Girlfriend सोमी अलीचा सलमान खानला इशारा

Continues below advertisement

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान त्याच्या सिनेमांसोबत अफेअर्समुळे चर्चेत असतो. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. आता एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर पोस्ट करत सलमानवर आरोप केलेत. बॉलिवूडच्या हार्वी विन्स्टीनचं एक दिवस भांडं फुटणार असा इशारा कुणाचंही नाव न घेता सोमी अलीनं लगावलाय. ज्या महिलांवर अत्याचार केले त्या एक दिवस समोर येऊन सत्य सांगतील, ज्या पद्धतीने ऐश्वर्या राय बच्चननं केलं अशी पोस्ट सोमी अलीने केलीय. त्यामुळे सोमी अलीची ही पोस्ट सलमानला इशारा असल्याच्या चर्चा रंगल्यात. सोमीने उल्लेख केलेला हार्वी विन्सटीन हा एक प्रसिद्ध हॉलिवूड निर्माता आणि चित्रपट निर्माता आहे. हार्वीवर एक, दोन नव्हे तर अनेक महिला आणि अभिनेत्रींनी बलात्कार, मारहाण, लैंगिक अत्याचार आणि धमक्या दिल्याचे आरोप होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram