Maharashtra Heat : राज्यात पारा 2 ते 3 अशांनी वाढणार, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट
विदर्भात उष्णतेची लाट आली असून तापमान 44 अंशापार गेलंय. चंद्रपुरात सर्वाधिक 44.2 अंश सेल्सियस तापामानाची नोंद झालीय. चंद्रपुरात गेल्या 50 वर्षात मार्च महिन्यातील हे सर्वात उच्चांकी तापमान ठरलंय. तर अकोल्यातील तापमान 43.2 अंश सेल्सिअवर पोहोचलंय. पुढचे काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दुपारच्या वेळेत अतीनील किरणांची तीव्रता अधिक असल्यानं पुढील किमान चार दिवस दुपारच्या उन्हात जाणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.