Salman Khan Case : गोळीबार प्रकरणी आरोपींना अनोळखी व्यक्तींकडून वस्तू पुरवण्यात आल्याची माहिती समोर
Salman Khan Case : गोळीबार प्रकरणी आरोपींना अनोळखी व्यक्तींकडून वस्तू पुरवण्यात आल्याची माहिती समोर सलमान खानच्या घरी झालेल्या फायरिंग प्रकरणात आरोपींना विविध टप्यावर अनोळखी व्यक्तींकडून विविध गोष्टीपुरवण्यात आल्याची माहिती तपासात समोर विशेष म्हणजे प्रत्येकवेळी या वस्तू देण्यासाठी येणारी व्यक्ती आरोपींसाठी अनोळखी असायची दोन्ही आरोपींना गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तींकडून पुरवण्यात आले होते तर खर्चासाठी लागणारे पैसे ही अनोळखी व्यक्ती दिले होते. त्याच बरोबर घर भाड्याने घेण्यासाठी अनोळखी व्यक्तीने मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच आरोपींना अनोळखी व्यक्तींकडूनच सीमकार्ड पुरवण्यात आले मात्र या अनोळखी व्यक्ती व आरोपींमध्ये समन्वय ठेवणारी व्यक्तीही एकच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही आरोपी फायरिंगचा कट रचताना अनमोल बिष्णोईच्या संपर्कात होते मात्र फायरिंग करण्यापूर्वी व केल्यानंतर दोघांमध्ये एक व्यक्ती हा मध्यस्थी म्हणून काम करत असल्याचेही तपासात समोर आले असल्याचे कळते