Salim Shaikh :माझा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही,मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावे
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
12 Apr 2022 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : माझा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. महाराष्ट्रात वेगळं चित्र रंगवलं जात आहे. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावेत असं आवाहन मनसे नेते सलीम शेख यांनी केलं आहे.
सलीम शेख म्हणाले, साहेबांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज्याचे चित्र बदलले. प्रसारमाध्यामे आमची प्रतिक्रिया जाणून घेत होते. मनसेच्या काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र पक्षाचा राजीनामा कोणी दिलेला नाही. राज ठाकरे कोणताही जातीधर्म न मानता जनतेसाठी काम करतात. त्यामुळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी जे राजीनामे दिले त्यांनी ते मागे घ्यावे.