Maratha Samaj on Sharad Pawar : मराठा आरक्षणासाठी पवारांनी नेतृत्व करत मार्गदर्शन करावं
मराठा आरक्षणाबाबत आता शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करत मार्गदर्शन करावं असं आवाहन सकल मराठा समाजाने आज केलंय. सकल मराठा समाजातर्फे नाशिकमध्ये आज पत्रकार परिषद झाली. तसंच शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन प्रश्न सोडवला तर आम्ही सर्व मराठा समाज आपल्यासोबत राहू, नाहीतर राज्यभर लाक्षणिक उपोषण करू, आणि पहिलं उपोषण हे पवारांच्या घरापासून असेल असा इशाराही देण्यात आलाय.
''...तर राजकीय आरक्षण बंद केल्यास माझा पाठिंबा''; लक्ष्मण मानेंचा संताप, शरद पवारांच्या भेटीनंतर विधानसभेवरही बोलले
पुणे : लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं. राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा जिंकता आल्या, तर महायुतीला केवळ 17 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर उपराकार लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने (Laxman mane) यांनी शरद पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी, एससी समाजाच्या जागांवर इतर समाजाचे लोकं खोट्या प्रमाणपत्राच्याआधारे निवडून येत असल्यावरुन त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, नवनीत राणा यांच्या नावाचा उल्लेख करत राखीव जागांवरुन खोट्या प्रमाणपत्राचा वापर होत असल्याचेही मानेंनी म्हटले.