Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?
Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?
गुरुवारी पहाटे सैफवर शस्त्रक्रिया पार पडली, त्यांना शस्त्रक्रियेनंतर त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. शुक्रवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. पाठीमध्ये खोल जखम असल्याने त्याला बेडरेस्टची गरज आहे. त्याच्या पाठीत पाणी झालं होतं, त्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्याला आराम करण्याची गरज आहे. आज त्याला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येईल.
रक्तबंबाळ अवस्थेत स्वत: चालत रुग्णालयात पोहोचला सैफ
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार की, रक्तबंबाळ सैफ अली खान एका वाघासारखा रूग्णालयात दाखल झाला होता. त्याच्यासोबत त्याचा लहान मुलगा तैमूरही होता. सैफच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे. सैफ आता चालू लागला आहे. आयसीयूतून त्याला स्वतंत्र रूममध्ये शिफ्ट केलंय. सैफ अली खान यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.