Saif Ali Khan Case : सैफच्या आरोपीला नेताना गाडी बंद, पोलिसांनी दिला धक्का | VIDEO

Continues below advertisement

Saif Ali Khan Case : सैफच्या आरोपीला नेताना गाडी बंद, पोलिसांनी दिला धक्का | VIDEO

Saif Ali Khan Knife Attack : अभिनेता सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला आज कोर्टात हजर करण्यात आलं पण, त्याआधी पोलिसांची गाडी बंद पडली. त्यावेळी पोलिसांनी गाडी धक्का मारला पण, गाडी सुरु झाली नाही. दरम्यान, तरीही गाडी सुरु झाली नाही. आरोपीची पोलिस कोठडी संपल्याने त्याला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी 19 जानेवारीपासू पोलिस कोठडीमध्ये आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा पोलिस तपास करत असून आरोपी विरोधात भक्कम पुरावे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आता आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी बंद पडली

सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला आज न्यायालयात घेऊन जाण्यासाठी पोलिस बाहेर पडले.  आरोपीला पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलिस निघाले. पण, अचानक गाडी बंद पडली. यानंतर पोलिसांना उतरुन गाडीला धक्का मारावा लागला. पोलिसांनी धक्का मारुनही गाडी स्टार्ट झाली नाही, त्यानंतर पोलिसांना दुसऱ्या गाडीतून जावं लागलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola