
Mahakumbh Mela Stampede : पत्नी आणि नातेवाईक हरवले..,मी पडलो, माझ्या अंगावरुन लोक गेले
Mahakumbh Mela Stampede : पत्नी आणि नातेवाईक हरवले..,मी पडलो, माझ्या अंगावरुन लोक गेले
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. यामध्ये मध्यरात्री (29 जानेवारी) एक वाजताच्य सुमारास चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची तर 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना फोन केल्याची माहिती आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथ आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. योगी आदित्यनाथांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ असाल तिथं स्नान करा, संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असं देखील आवाहन योगी आदित्यनाथांनी केलं. योगी आदित्यनाथ म्हणाले की स्नानासाठी अनेक घाट बनवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाविकांना प्रशासनाच्या निर्देशांचं पालन करण्याचं आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका,असं देखील ते म्हणाले. कुंभमेळा अधिकारी विजय किरण यादव यांनी देखील योगी आदित्यनाथांना माहिती दिली आहे.