Saif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळी
Saif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळी
अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकऱणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनी आरोपीला सोबत घेत घटनास्थळांची पाहणी केली सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी शेहजादला सिन रिक्रिएशनसाठी नेले सैफच्या घरी सैफ अली खानवर हल्ला करून आरोपी कसा पळाला, वांद्रे स्थानक पर्यंत कसा पोहचला त्या त्या ठिकाणी पोलिस आरोपीला घेऊन त्याची माहिती घेत आहेत सैफच्या इमारतीत प्रवेश करताना आरोपी कुठल्याही सीसीटीव्हीमधे दिसत नाही आहे. मग तो सैफच्या घरात पोहचला कसा याचा तपास पोलिस करत आहेत.
हे ही वाचा..
ऑटोरिक्षा चालक भजन सिंह राणा सैफ अली खानसाठी तारणहार ठरला कारण दुसरा कोणताही ड्रायव्हर उपलब्ध नसताना त्याने सैफला तातडीने रुग्णालयात नेलं. रिक्षाचालकाने घडलेला प्रसंग सांगिताना म्हटलं की, "मी इमारतीजवळून जात होतो, तेव्हा अचानक मला कोणीतरी ऑटो हाक मारल्याचा आवाज आला. एक महिला घाबरून गेटमधून बाहेर आली आणि मदत मागितली. काही मिनिटांनंतर, सैफ अली खान, इतर काही जणांसह, बाहेर आला आणि माझ्या ऑटोमध्ये बसला. त्याने पांढरा कुर्ता घातला होता आणि तो रक्ताने माखलेला होता".