ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January 2 2025
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी संपन्न...अमेरिकेत सुरु झालं ट्रम्पपर्व... बायडन सरकारच्या ७८ निर्णयांना स्थगिती, दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा
महाविकास आघाडीची आज संध्यकाळी मुंबईत बैठक, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता, तिन्ही पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार.
धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती...घर फुटतंय असं गोपीनाथ मुंडेंनाही सांगितलं...एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जितेंद्र आव्हाडांनी सांगितला किस्सा...
२६ जानेवारीला नियुक्ती झालेल्या पालकमंत्र्यांच्या हस्तेच ध्वजारोहण होणार, नियुक्ती रद्द झाली तरीही रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण
नाराजी नाही, पण पालकमंत्रिपदाची अपेक्षा करणं काय वाईट, दरे गावातून एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया...शिंदेंसोबत चर्चा झाली होती, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण...
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त लावलेला बॅनर काढल्याने शिवसैनिक आक्रमक, मुंबईतील सायन-प्रतीक्षा नगरमधील बॅनर पालिका अधिकाऱ्यांनी हटवल्याने शिवसैनिक रस्त्यावर.
३१ मेपर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत, १ फेब्रुवारी ते ३१ मेपर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश.