Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी वांद्रे कोर्टात आरोपीला हजर करण्यात आलं, त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
सैफ अली खानच्या हल्लेखोराला 5 दिवसाची पोलिस कोठडी
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला शनिवारी रात्री पोलिसींनी अटक केली आहे. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. यानंतर त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम सज्जाद आहे, जो आतापर्यंत विजय दास या नावाने राहत होता. आरोपीकडे कोणतेही वैध भारतीय कागदपत्र नाही. पोलिसांना संशय आहे की आरोपी भारतीय नाही तर तो बांगलादेशातून बेकायदेशीरपणे आला आहे.