Sai Tamhankar Majha Katta : सांगली ते सिनेमा, ब्युटी ते बोल्ड...सई ताम्हणकरचा प्रवास माझा कट्ट्यावर
बोल्ड बिनधास्त आणि ब्युटीफूल अशी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar ). मराठी अभिनेत्रींना इतर इंडस्ट्रीमध्ये असलेल्या मर्यादा या सईने मोडित काढत एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. सांगली ते मुंबई असा सई ताम्हणकरचा सही प्रवास हा तिने नुकताच माझा महाकट्टावर उलगडला आहे. तसेच आयुष्यात कधी आपण निर्माता वैगेर व्हावं का या प्रश्नाचं उत्तरही सईने कट्टावर दिलं.
सई ही मुळची सांगलीची असल्यामुळे तिने तिच्या सांगलीच्या काही शब्दांची देखील गंमत यावेळी सांगितली. सांगलीच्या मुलीला मुंबईविषयीच्या भावना देखील तिने यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून सई घराघरांत पोहचली. त्याविषयी देखील तिने कट्ट्यावर भाष्य केलं आहे. मुंबई ही एक मायानगरी आहे. इथे एकटं राहणं, स्वत:च्या जीवावर राहणं असं करताना तुम्ही कधीकधी खूप थकून जाता. त्यासाठी तुमचं डोकं शांत राहणं खूप गरजेचं आहे, असंही सईने म्हटलं आहे.