Sada Sarvankar File Nomination : सदा सरवणकरआज उमेदवारी अर्ज भरणार, माहिमध्ये तिरंगी लढत

Sada Sarvankar File Nomination : सदा सरवणकरआज उमेदवारी अर्ज भरणार, माहिमध्ये तिरंगी लढत

 माहिम विधानसभा मतदारसंघातून यंदा तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सदा सरवणकर, मनसेचे अमित ठाकरे अन् शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यातील काही मतदारसंघात भाजपा आणि मनसेत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे माहिममधून सदा सरवणकर यांचा अर्ज मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली. परंतु, सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा पहिल्यांदाच अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली असून माहिममधून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली जातेय. परिणामी सदा सरणवकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव वाढला होता. येत्या २४ तासांत त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं म्हटलं गेलं होतं. परंतु, त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवरून उद्या म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी अर्ज भरायला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola