Sada Sarvankar EXCLUSIVE : शिदेंसोबतच्या बैठकीत काय झालं ? उमेदवारी मागे घेणार?

Continues below advertisement

Sada Sarvankar EXCLUSIVE : शिदेंसोबतच्या बैठकीत काय झालं ? उमेदवारी मागे घेणार?

मनसेने ज्या ठिकाणी महायुतीीविरोधात उमेदवार उभे केले आहेत ते मागे घ्यावे, अशी मागणी मी केली होती त्याप्रमाणे मनसेनं उमेदवार मागे घेण्याची तयारीही दाखवली होती... मात्र सगळे मागे घ्यावे अशी माझी मागणी होती माहिममधे अशी समीकरणंं नाहीत की अमित ठाकरे निवडून येतील काही लोक मैत्रीखातर अमित ठाकरेंचा प्रचार करतील असं आहे..अखंड भाजप असं कऱणार नाही...तळागाळातील भाजपचा माणूस माझ्यासोबत आहे

हे ही वाचा...

माहीम मतदारसंघातून (Mahim Vidhan Sabha Election 2024) सदा सरवणकर (Sada Sarvankar) माघार घेणार का याची उत्सुकता आहे. मनसेने महायुतीविरोधातले सर्व उमेदवारे मागे घेतले तर निर्णय घेऊ असं सरवणकर यांनी म्हटलंय. सरवणकरांच्या या वक्तव्यानंतर मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे.   सदा सरवणकर कुठला तर्क लावताय? आम्ही अर्ज मागे घेण्यासाठी विनंतीच केली नाही, असे वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केले आहे. तसेच  मनोज  जरांगे पाटील यांना मुस्लिम धर्मगुरूंनी धोका दिला, म्हणून त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असावा, असे देखील प्रकाश महाजन म्हणाले.

प्रकाश महाजन म्हणाले,  कुठला तर्क सदा सरवणकर  लावत आहेत.  सदा सरवणकर  यांना आम्ही कधीच म्हटलं नाही की तुम्ही अर्ज मागे घ्यावा .आम्ही कुठेही विनंती सदा सरवणकर केली नाही. स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी सदा सरवणकर  वक्तव्य करतात . आम्ही लढणार आहे हे निश्चित पण आम्ही सरवणकर यांना  कधीच म्हटलं नाही तुम्ही अर्ज मागे घ्या. सदा सरवणकर यांना सिद्धिविनायकांचा अध्यक्ष पद दिले त्यांनी गजाननाची सेवा करावी तरुण पिढीला वाव द्यावा.  अमित ठाकरे यांचे वडिलांचे नाव जर राज ठाकरे आहेत याचा अर्थ अमित ठाकरे हे राजपुत्र  असा होत नाहीत. सरवणकर यांनीच हे बॅनर लावलं आहे. 

मुस्लिम धर्मगुरूंनी धोका जरागे पाटलांना धोका दिला : प्रकाश महाजन

 मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार  घेतली आहे. तसेच  समर्थकांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केले. याविषयी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, मनोज  जरांगे पाटील यांना मुस्लिम धर्मगुरूंनी धोका दिला  म्हणून त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असावा. मुस्लिमांचे ठरलेले आहे की, कोणाच्या बाजूने मतदान करायचं आणि कोणाच्या विरोधात करायचा आहे. 
मौलाना, नौमानी यांचा जे वक्तव्य आहे त्यातून हिंदूधर्म मानणाऱ्या  पक्षाच्या विरोधात मुस्लिमांना मतदान करायचा आहे.  जे हिंदूंना आपलं मानतात त्यांच्या विरोधात मुस्लिम मतदान करणार हे निश्चित आहे.   त्यामुळे हिंदूंनी सुद्धा याचा विचार करावा.  जरांगे पाटील समाजासाठी काम करत आहेत आणि पुढे सुद्धा ते समाजासाठी काम करत राहतील.  त्यामुळे समाजाचा विचार करून त्यांनी भूमिका घेतली असेल.   लोकसभेसारखे आता परिस्थिती नाही त्यामुळे फायदा तोटा या भूमिकेचा कोणाला होईल हे सांगता येणार नाही. मुस्लिम धर्मगुरूंनी फारशी रुची जरांगे पाटील यांच्या सोबत जाण्याची दाखवली नाही. मुस्लिम धर्मगुरूंनी जरांगे पाटील यांना फसवलं असं माझं मत आहे. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram