Rahul Mote Sharad Pawar Candidate : शरद पवार पक्षाचे राहुल मोटेच मविआचे अधिकृत उमेदवार, ठाकरे गट उमेदवार अर्ज मागे घेणार
Rahul Mote Sharad Pawar Candidate : शरद पवार पक्षाचे राहुल मोटेच मविआचे अधिकृत उमेदवार, ठाकरे गट उमेदवार अर्ज मागे घेणार
भूम परंडा येतील बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला यश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रणजीत पाटील उमेदवार थोड्याच वेळात उबाठाचे रणजीत पाटील आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार शरद पवार यांच्याशी फोनवरून रणजीत पाटील यांची चर्चा झाल्यानंतर निर्णय शरद पवारांचे ६ बंडखोर देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार शरद पवारांच्या बंडखोर उमेदवाराना सूचना
हे ही वाचा...
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय. उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.
काँग्रेसचे रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक आक्षेप
रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.