Mumbai : काल देशमुखांच्या वकिलांनी केलेल्या उलटतपासणीदरम्यान वाझेंचे एनआयएवर आरोप ABP Majha

Continues below advertisement

चांदीवाल आयोगासमोर काल अनिल देशमुखांच्या वकिलांनी केलेल्या उलट तपासणीदरम्यान सचिन वाझेंनी एनआयएवर गंभीर आरोप लावले.. जबरदस्तीनं कागदपत्रांवर सह्या घेतल्याचा आरोप सचिन वाझेंनी एनआयएवर लावलाय. दरम्यान आज पुन्हा एकदा सचिन वाझे, तसंच अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर हजर झाले आहेत. आज पुन्हा एकदा अनिल देशमुखांच्या वकिलांकडून सचिन वाझेंची उलट तपासणी होण्याची शक्यता आहे. आणि आज सचिन वाझे आरोपांचे नवीन बॉम्ब फोडणार की उत्तर देताना नकारघंटा वाजवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram