Sachin Tendulkar at Oath Ceremony : दादा-भाई-भाऊंचा शपथविधी, सचिन तेंडुलकर सपत्नीक उपस्थित

Continues below advertisement

Sachin Tendulkar at Oath Ceremony : दादा-भाई-भाऊंचा शपथविधी, सचिन तेंडुलकर सपत्नीक उपस्थित

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मविआच्या बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. मविआचे बडे  नेते देखील शपथविधीला हजर राहणार नाहीत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारंसघाचे आमदार अभिजीत पाटील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. 

कोण आहेत अभिजीत पाटील?

अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम करण्याचा निर्णय घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याऐवजी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचं काम करण्याचा निर्णय घेतला होता.  लोकसभेनंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले आणि माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आमदार झाले. आज ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आझाद मैदानात दाखल झाले आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram