Majha Vision 2021 : मराठी सिनेमांना Theater मिळण्यासाठी सरकारचं अंकुश महत्वाचं : Sachin Pilgaonkar

Continues below advertisement

आज प्रेक्षक अत्यंत दक्ष झाले आहेत. आज आपण जी काही कलाकृती करतो ती प्रेक्षकांसाठी करतो. त्यांची पावती मिळाल्याशिवाय काहीच काही. ते जेवढे दक्ष होतील तेवढेच कलाकृती बनवणारी माणसं आपले टूल्स बदलतील. आता काहीही करुन उपयोगाचं नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात. हा बदल प्रेक्षकांमध्ये आधी झाला नंतर आमच्यामध्ये बदल झाला. आधी प्रेक्षक सुधरले आणि प्रेक्षकांनी आम्हाला बदलवलं. तरीही चुका आजही घडतच आहेत, असं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले. 

आज एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.  राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. यामुळं अनेक कलाकारांसह मनोरंजन क्षेत्रातील लोकांवरही संकट आलं आहे. यासंदर्भात सचिन पिळगावकर यांच्याशी संवाद साधला. 

सचिन पिळगावकर म्हणाले की, आज सिनेमा क्षेत्रात अनेक बदल झालेत. आज डिजिटल स्वरुप झालंय पण आधीसारखी मजा नाही. मात्र याचा अर्थ असा नाही नवीन गोष्टींना मी मानत नाही. मला आज 58 वर्ष या क्षेत्रात झाली आहेत. या काळात मी नवीन प्रयोग करत राहिलो. मी अजूनही शिकतो आहे, असंही पिळगावकर म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram