Saamana Editorial 'मुसलमानांना नमक हराम म्हणता, मग Taliban साठी पायघड्या का?', Giriraj Singh वर टीका
Continues below advertisement
भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) आणि सामनाच्या (Saamana) अग्रलेखावरून राजकीय वाद पेटला आहे. 'मुसलमानांना नमक हराम म्हणणं हा भाजपवाल्यांचा छंद आहे, पण ज्यांच्याविरोधात दहशतवादी म्हणून हंबर्डा फोडला, त्या अफगाण तालिबान्यांसाठी (Taliban) दिल्लीत पायघड्या घातल्या जातात', असा थेट सवाल 'सामना'तून मोदी सरकारला विचारण्यात आला आहे. संरक्षण खात्यातील गुपितं पाकिस्तानला पुरवणाऱ्यांचा संबंध संघाशी होता आणि गिरीराज सिंह अशा लोकांचे समर्थन करतात, असा गंभीर आरोपही अग्रलेखात करण्यात आला आहे. सरकारच्या योजनांचा लाभ घेऊनही मुस्लिम समाज भाजपला मतदान करत नसल्याने गिरीराज सिंह यांनी त्यांना 'नमक हराम' म्हटले होते, यावरून हा वाद सुरू झाला. या टीकेला उत्तर देताना, सामनाने देशातील हिंदू मतदारही अनेक राज्यांत भाजपच्या विरोधात मतदान करतात, मग त्यांनाही नमक हराम म्हणणार का, असा प्रश्न विचारला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement