Saamana Editorial | राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे भाजपची खेळी : सामना | ABP Majha

दैनिक सामनातून राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्यात आलंय. मराठी प्रश्नावर राज ठाकरेंना काही करता आलं नाही. त्यामुळे ते हिंदुत्वावादी मुद्द्याकडे वळले आहेत. पण हिंदुत्व पेलणं हे येरागबाळ्याचा खेळ नाही. असं म्हणत थेट राज ठाकरेंवर टीका कऱण्यात आली आहे. एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे भाजप असल्याचा टोलाही सामनाच्या अग्रलेखातून हाणल आहे. एका महिन्यापूर्वी राज ठाकरेंनी सीएएला विरोध केल्याची आठवणही सामनातून करुन दिली आहे. तसेच अमित शाहांच्या खेळीचे राज ठाकरे बळी ठरल्याचा आरोपही सामनाच्या आग्रलेखातून करण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola