Samna Editorial | राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकीत 'घोडेबाजार' रोखण्यासाठी कायदा करा, सामनातून मागणी
सामना वृत्तपत्रानं आज अग्रलेखातून संविधानिक पदांच्या निवडणुकीत होणारा 'घोडेबाजार' रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींसारख्या पदांच्या निवडणुकीत सत्ताधारी 'घोडेबाजार' करत असतील, तर तो रोखणारा कायदा तात्काळ करावा, असं सामनानं म्हटलंय. निवडणुकांपासून कुणालाच लांब राहता येणार नाही यासाठी मतदान खुल्या पद्धतीनं व्हावं, अशी तरतूद आवश्यक आहे. 'घोडेबाजारात' सामील होऊन तटस्थतेचा सौदा करून मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द करण्याची मागणीही सामनानं केली आहे. नव्या उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची आणि लोकशाही, संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी आहे. त्यांनी राष्ट्रहितासाठी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, असं अग्रलेखात नमूद केलं आहे. "खुर्चीवर बसल्यावर माणूस खरे रंग दाखवतो," असंही सामनानं म्हटलं आहे.