CP Radhakrishnan Oath Ceremony | सी.पी राधाकृष्णन आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार
नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सी पी राधाकृष्णन यांना शपथ देतील. या सोहळ्याला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, पंजाबचे राज्यपाल आणि चंडीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया, झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे उपस्थित राहणार आहेत. जगदीप धनकड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्यानं उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली होती. त्यानंतर या पदासाठीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यात महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा विजय झाला तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव झाला.