Phaltan Case: 'आत्महत्येपूर्वी भांडण', Rupali Chakankar यांच्या विधानावरून वाद, ठाकरे गट आक्रमक

Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे (Doctor Suicide Case) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी, विशेषतः ठाकरे गटाच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT) त्यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केली आहे. चाकणकर म्हणाल्या होत्या, 'लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिला डॉक्टर बनकर यांच्या घरी होत्या, फोटो काढण्यावरून त्यांच्यात वाद झाला'. या विधानानंतर पीडितेच्या चारित्र्यहननाचा आरोप करत ठाकरे गटाने चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील चाकणकर यांच्या भूमिकेशी असहमती दर्शवली असून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाईल असे म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola