Election Code: 'पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता', Ajit Pawar यांचं मोठं विधान

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुका, आचारसंहिता आणि कर्जमाफीसंदर्भात महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. 'पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे,' असं स्पष्ट वक्तव्य अजित पवार यांनी निधी वाटपाच्या संदर्भात बोलताना केलं आहे. यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत कोणताही नवीन विकास निधी वितरित केला जाणार नाही, असे संकेत त्यांनी दिले आहेत. याचबरोबर, त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. याआधी देवेंद्र फडणवीस सरकार आणि पूर्वीच्या सरकारने कर्जमाफी दिली होती, पण वारंवार कर्जमाफी देणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचं त्यांनी सूचित केलं. यासाठी हजारो कोटी रुपयांची आवश्यकता लागेल, असंही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola