Ajit Pawar : रुपाली चाकणकरांची खुर्ची संकटात? फलटण प्रकरणातील भूमिका अजित पवारांना अमान्य
Continues below advertisement
महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी केलेल्या वक्तव्यांवरुन NCP अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही', असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. चाकणकर यांनी पीडित डॉक्टर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणारे वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याने चाकणकर यांचे पद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चाकणकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला आहे. आयोगाची प्रतिष्ठा धोक्यात आणणारी व्यक्ती पदावर नसावी, अशी भूमिका घेत कुटुंबीयांनी अजित पवारांकडे कारवाईची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement