Mumbai Hostage Crisis: पवईतील थरारनाट्य संपले, २२ मुलांची सुखरूप सुटका; आरोपी Rohit Arya ताब्यात
Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथील 'रा' स्टुडिओमध्ये (RA Studio) एका ऑडिशनसाठी आलेल्या सुमारे २२ मुलांना रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने ओलीस ठेवल्याने खळबळ उडाली. 'माझ्या मागण्या मान्य न झाल्यास किंवा पोलिसांनी कोणतीही चुकीची हालचाल केल्यास मी या संपूर्ण जागेला आग लावून देईन,' अशी धमकी आरोपी रोहित आर्य याने व्हिडिओ जारी करत दिली होती. शूटिंगच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून या मुलांचे वर्ग घेतले जात होते. आज मुलांना दुपारच्या जेवणासाठी बाहेर न सोडल्याने हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी मुंबई पोलीस (Mumbai Police), अग्निशमन दल आणि कमांडो पथकही दाखल झाले होते. अनेक तासांच्या थरारनाट्यानंतर, पोलिसांनी आर्य याला ताब्यात घेतले आणि सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. या घटनेमुळे मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement