Ajit Pawar on RTPCR : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी RTPCR चाचणी अनिवार्य

Continues below advertisement

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. आपण जेव्हा इतर राज्यात जातो तेव्हा आपला आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट आवश्यक असतो, तर मग आपल्या राज्यात येणाऱ्यांसाठीही तो आवश्यकच असेल असं अजित पवारांनी म्हटलंय. तसेच परदेशातून भारतातील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशासंदर्भातील नियमावलीतील तफावतही राज्य सरकारनं दूर केल्याची माहिती अजित पवारांनी दिलीय. ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशासंदर्भात राज्य सरकारनं 30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रानं आक्षेप घेतला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram