Mohan Bhagwat | Don't Translate Bharat | मोहन भागवत: भारताला Bharatच राहू द्या, ओळख गमावू नका!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या नावाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. भारताला 'भारत'च राहू द्यावे, त्याचे भाषांतर करू नये असे त्यांनी म्हटले आहे. कोचीनमधील राष्ट्रीय शिक्षण परिषदेला संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले. "भारताचं भाषांतर केलं, तर तो आपली ओळख आणि जगात मिळणारा आदर गमावेल," असे मोहन भागवत यांनी नमूद केले. भारताला सोन्याची चिमणी नाही तर सिंह बनायचे आहे असेही त्यांनी म्हटले. भारताने कधीही कोणाची जमीन ताब्यात घेतली नाही किंवा कोणाचे राज्य हिसकावून घेतले नाही. मेक्सिकोपासून सायबेरियापर्यंत प्रवास केला तरी भारताने कोणावरही आक्रमण केले नाही. भारताची ओळख आणि सन्मान कायम ठेवण्यासाठी 'भारत' हे नाव तसेच ठेवणे आवश्यक आहे असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.