Bhimashankar Temple | भीमाशंकरमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त लाखो भाविकांची गर्दी, फुलांनी सजले मंदिर
भीमाशंकर या ठिकाणी आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग आहे. मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज पहाटेच्या आरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं. मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरात भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे महत्त्व मोठे असते. या पवित्र दिवशी दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.