ABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 Nov 2025 : TOP Headlines : ABP Majha

Continues below advertisement
RSS प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी 'सनातन धर्म म्हणजेच हिंदू राष्ट्र' असल्याचे मोठे विधान केले आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) 'Accidental CM' म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, 'तसं पाहिलं तर देवेंद्र पण अॅक्सिडेंटलच आहेत ना?'. यासोबतच, रायगडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी (NCP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena) संघर्ष पेटला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (MVA) कोल्हापूर, धुळे आणि धाराशिवमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर, नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कुंभमेळ्यातील मुस्लिमांच्या दुकानदारीवरून केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत आले असून, राज्य अल्पसंख्याक आयोग (State Minority Commission) त्यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्ष पदासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याची मिश्किल टिप्पणी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola