Mohan Bhagwat : हिंदू नाव लावणाऱ्यांना देशाप्रित कटिद्ध राहावं लागेल - मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नवी दिल्लीत विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी सरसंघचालकांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी 'हिंदू' या शब्दाची व्याख्या अधोरेखित केली. "जो अपने आपको हिंदू कह रहे हैं, पहले उनको संगठित करो। उनका जीवन अच्छा बनाओ। तो किसी कारण जो अपने आप को हिंदू हो के भी नहीं कहते, वो भी कहने लगेंगे," असे सरसंघचालक म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, 'हिंदू' नाव लावणाऱ्यांना देशाप्रती कटिबद्ध राहावे लागेल. 'हिंदू राष्ट्र' या संकल्पनेवर बोलताना त्यांनी 'राष्ट्र' आणि 'नेशन' यातील फरक स्पष्ट केला. 'नेशन' ही पाश्चात्त्य संकल्पना असून, तिच्यासोबत 'स्टेट' जोडले जाते, तर 'राष्ट्र' या संकल्पनेसाठी 'स्टेट' आवश्यक नाही. आपले 'राष्ट्र' पूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधीजींनीही 'एक राष्ट्र' म्हणून आपण अनेकदा लढलो आहोत, असे म्हटले होते, याचा संदर्भही त्यांनी दिला. संपूर्ण समाजाचे संघटन करणे हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.