Honor Killing | नांदेडमध्ये पित्याने मुलीसह प्रियकराची केली हत्या

नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडमध्ये एका पित्याने आपल्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणी संजीवनीचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. मात्र, लग्नापूर्वीपासूनच तिचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि लग्नानंतरही ते कायम होते. घरातील मंडळी बाहेर गेल्याचे पाहून संजीवनीने प्रियकराला घरी बोलावले होते. मात्र, घरचे वेळेपेक्षा आधीच घरी परतल्याने तरुणी आणि प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडण्यात आले. यानंतर संतापलेल्या सासऱ्यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून घरी बोलावले. मुलीचे वडील आणि आरोपी मारुती सुरणे यांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारहाण करून त्यांची हत्या केली. त्यानंतर दोघांचे मृतदेह विहिरीत फेकून दिले. या घटनेनंतर आरोपी मारुती सुरणे यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola