Mission Mumbai: 'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आक्रमकतेनं उतरा', RSS-BJP बैठकीत पदाधिकाऱ्यांना निर्देश
Continues below advertisement
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आला आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. 'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आक्रमकतेनं उतरा,' असे स्पष्ट निर्देश या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. महायुतीसोबत लढतानाही अधिक जागा मिळवण्यावर भाजपचा भर असून, विकासकामांसोबत हिंदुत्वाचा मुद्दाही प्रभावीपणे मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नरेटिव्हच्या लढाईत गाफील न राहण्याचा सल्लाही या बैठकीत दिला गेला. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असल्याने या बैठकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement