RSS on Love Jihad : 'लव्ह जिहादच्या यशात आमचीच चूक', सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान
Continues below advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'लव्ह जिहाद' आणि संघ सदस्यत्वावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. 'लव्ह जिहादच्या यशात आमची चूक आहे, कारण आपण आपल्या मुलांना घरात योग्य संस्कार आणि मर्यादा देण्यात कमी पडलो', असं परखड मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले की, संघात सामील होण्यासाठी सर्वांचे स्वागत आहे, पण एक अट आहे. 'संघात ब्राह्मण, मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणून कोणाला प्रवेश नाही, फक्त हिंदूंना प्रवेश आहे', असं ते म्हणाले. मात्र, 'हिंदू' या शब्दाची व्यापक व्याख्या करत, जे भारताला आपली भारतभूमी मानतात, ते सर्व जण आपली ओळख बाजूला ठेवून संघात येऊ शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भागवत यांच्या या वक्तव्यांची देशभर चर्चा होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement