Mahurgad Renuka Mata Mandir : रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूरगडावर लवकरच 'रोप वे'सेवा
रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूरगडावर 'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये करार झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली. माहूरगड नांदेड जिल्ह्यात असून, हे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण या प्रकल्पाचा पाठपुरावा करीत होते.